जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितिच्या वतीनं सोमवारी मुंबईच्या आझाद मैदानावर ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या या मोर्चात सर्व विरोधी पक्षांचे नेते तसंच मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते.
आधीच जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेली शिक्षकांची कमतरता, डिजिटल संसाधनांचा तुटवडा आणि अंमलबजावणीबाबत अस्पष्टता, यामुळं शिक्षकांमध्ये पहिलीपासून आणखी एक नवीन विषय कसा शिकवायचा, असा प्रश्न राज्यातील शिक्षकांसमोर उभा आहे.
यावर्षी लवकर दाखल झालेल्या मान्सूनामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणं आणि शेतोपयोगी खतांच्या दरवाढीला सामोरं जावं लागत आहे. गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळं पिकांचं झालेलं नुकसान आणि उत्पादनाला मिळालेला अत्यल्प भाव, यामुळं शेतकरी आधीच अडचणीत आहे.
महाराष्ट्र सरकारनं त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून लादलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया पुणे शहर समितीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करून 'सर्वसाधारणपणे' हिंदी भाषा पहिलीपासूनच शिकवली जाण्याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारनं १७ जून रोजी प्रसिद्ध केला.
१ जून २०२५ पासून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसच्या तिकीट दरात जवळपास दुपटीनं वाढ करण्यात आली आहे. यामुळे शहरातील रोजच्या प्रवासासाठी बसवर अवलंबून असलेल्या कामगार आणि विद्यार्थी वर्गावर आर्थिक ताण वाढला आहे.